esakal | राजस्थानात अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी मराठी अधिकारी बनला देवदूत
sakal

बोलून बातमी शोधा

राजस्थानात अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी मराठी अधिकारी बनला देवदूत
  • अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी मराठी अधिकारी ठरला देवदूत
  • संवेदनशीलतेमुळे राज्यात परतण्याचा मार्ग मोकळा

राजस्थानात अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी मराठी अधिकारी बनला देवदूत

sakal_logo
By
प्रशांत कांबळे : सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राजस्थान येथील कोटा शहरात महाराष्ट्रातील दोन हजार विद्यार्थी लॉकडाऊनमूळे अडकले आहे. या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहे. पालकही मागणी करुन थकले असताना राजस्थान केडरचा एक मराठी अधिकारी या मुलांसाठी धावून आला आहे. या अधिकाऱ्याच्या संवेदनशीलतेमुळे अनेक विद्यार्थ्यांच्या महाराष्ट्रात परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

अधिक आणि सविस्तर बातम्या वाचण्यासाठी ईपेपर वाचा

राजस्थानमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरीक आणि  विद्यार्थ्यांची मदत करण्यासाठी राज्यपालांनी भास्कर सावंत, विरेंद्र सिंह, प्रदीप गवांडे या तीन सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली होती. अमरावतीच्या हुकूमचंद मालविय यांनी प्रदीप गवांडे यांच्याशी संपर्क साधून कोटा इथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी मदत मागितली. मुळचे लातूर जिल्हातले रहिवासी असलेल्या गवांडे यांनी पालकांच्या तक्रारी, अडचणी समजून घेतल्या. आणि तात्काळ, कोटा जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून राज्यातील यवतमाळ, अमरावती, नांदेड, नागपूर या जिल्ह्यांसह अनेक विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात परत येण्यासाठी आवश्यक परवानगी मिळवून दिली. यातील अनेक विद्यार्थी खासगी वाहनांनी सुखरूप आपल्या घरी परतले आहे.

संकट आहे गंभीर, मात्र मुंबई महापालिका आहे खंबीर, पण संकट दहा पट वाढलं तर... ? याला कारण आहे 'हे'...

कोरोना संकटाच्या पार्श्वभुमीवर जे शक्य आहे ते मी केलं. त्याची उल्लेखही नाही केला तरी चालेल. अनेक विद्यार्थ्यांना प्रवास करण्याची परवानगी  मिळवून देण्यात आली आहे. खाजगी वाहनाने हे विद्यार्थी महाराष्ट्रात पोहोचणार आहे.
- प्रदिप
गवांडे, आयएएस अधिकारी, राजस्थान

माझी मुलगी क्लासेससाठी कोटा इथे गेली होती. मात्र दोन वेळा लाॅकडाऊन झाल्याने तिला अडचणीचा सामना करावा लागत होता. आम्ही तिला परत आणण्यासाठी परवानगी मागितली. ती दिली गेली नाही, मात्र राजस्थान येथील गवंडे या अधिकाऱ्याला फोन केल्यानंतर तात्काळ परवानगी मिळाली. 
- आशिष शुक्ला, पालक, नागपूर

गुड न्यूज! प्लाझ्मा थेरपीचा मार्ग मोकळा...नमुन्यांची तपासणी अँटीबॉडीजसाठी सकारात्मक