डोंबिवलीत भीषण आग; अर्धा किलोमीटर परिसरातील घरं आणि शाळा केल्यात रिकाम्या...

डोंबिवलीत भीषण आग; अर्धा किलोमीटर परिसरातील घरं आणि शाळा केल्यात रिकाम्या...

डोंबिवली - काल मुंबईतील माझगावमध्ये आणि आज डोंबिवलीमध्ये, मुंबई आणि आसपासच्या परिसरात आगीचं सत्र थांबता थांबत नाहीये. डोंबिवली MIDC मधील केमिकल कंपनीला भीषण आग लागलीये. ही कंपनी त्याच रस्त्यावर आहे जिथले रस्ते काही दिवसांपूर्वी प्रदूषणामुळे गुलाबी झाले होते. याच भागातील डोंबिवली एमआयडीसीमधील मेट्रोपॉलिटन कंपनीत ही भीषण आग लागली आहे.

आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाकडून मोठ्या शर्थीचे प्रयन्त सुरु आहेत. अग्निशमनदलाच्या २० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात. कल्याण डोंबिवलीसोबतच बदलापूरमधील अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी मदत मागवली गेलीये. आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान डोंबिवली MIDC कडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. कल्याण शीळ मार्गाचा तूर्तास वापर करू नये असं कल्याणचे DCP विवेक पानसरे यांनी केलंय.  

तब्बल चार तासानंतरही या भीषण आगीवर नियंत्रण मिळवता आलेलं नाही. तब्बल पन्नास अग्निशमन अधिकारी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करतायत. आसपासच्या कंपन्यांमधील सर्व कर्मचारी आणि मजुरांना त्यांच्या कंपन्यांकडून बाहेर काढण्यात आलेलं आहे. आसपासचे सर्व रस्ते देखील रिकामे करण्यात आलेले आहेत.

सदर कंपनी ही केमिकल कंपनी असल्याने या आगीवर नियंत्रण मिळवणं अत्यंत कठीण असल्याचं बोललं जातंय. याठिकाणी कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरीही आजूबाजूच्या कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. जवळच्या सर्व नागरिकांना लवकरात लवकर घरं रिकामी करावीत असं आवाहन करण्यात येतंय. याचसोबत इतर डोंबिवलीकरांनी घरातून बाहेर पडू नये असं आवाहन देखील करण्यात येतंय. आसपासच्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना देखील सुटी देण्यात आलेली आहे.  

massive fire in dombivali midc metropolitan chemical company area closed for all operations

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com