
Boisar Fire
ESakal
सुमित पाटील
बोईसर : बोईसर पश्चिम भागात गोडाऊनला आज (ता. 23) भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. बोईसर रेल्वे स्थानक जवळील या गोडाऊन मध्ये औद्योगिक कचरा साठवनुक केल्याचे दिसून येते. बोईसर पश्चिम वंजारवाडा फाटक ते दांडी पाडा रस्त्यालगत असलेल्या अनधिकृत घनकचरा व भंगाराच्या गोडाऊनला भीषण आग लागली आहे. आगीत गोडाऊनमधील सर्व साहित्य जळून खाक झाले असून, घटनास्थळी अग्निशमन दलाची गाडी दाखल झाली आहे.