Mumbai Pune Highway : वाहनांच्या रांगा, तरी वसुली सुरूच; पनवेल टोलनाक्यावर वाहनचालकांनी घातला गोंधळ

Old Mumbai Pune Highway : जुन्या मुंबई पुणे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. विकेंडमुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झालीय. तरीही टोल नाक्यावर टोल वसुली सुरु असल्यानं वाहनचालकांनी संताप व्यक्त केला.
Weekend Rush Causes Massive Jam on Old Mumbai Pune Highway

Weekend Rush Causes Massive Jam on Old Mumbai Pune Highway

Esakal

Updated on

जुन्या मुंबई पुणे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्यानंतर पनवेल टोल नाक्यावर गोंधळ झाल्याची घटना समोर आलीय. पनवेल टोल नाक्यावर २ किमी पेक्षा जास्त अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मात्र तरीही टोल वसुली केली जात असल्यानं वाहनधारक संतप्त झाले होते. वाहनधारकांनी रस्त्यावर उतरून निषेध केला. तसंच टोल नाक्यावर गोंधळही घातला. याचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com