५० फूट उंचीवरून खाली पडून कंत्राटी रेल्वे कर्मचारी जखमी; माटुंगा कारशेडमधील घटना!

मध्य रेल्वेच्या माटुंगा कारशेडमध्ये छताची दुरुस्ती करत असताना एका कंत्राटी कर्मचारी खाली पडून जखमी झालेला आहे
Matunga Carshed Incident railway Contract worker injured after falling from height of 50 feet mumbai
Matunga Carshed Incident railway Contract worker injured after falling from height of 50 feet mumbaisakal

मुंबई : मध्य रेल्वेच्या माटुंगा कारशेडमध्ये छताची दुरुस्ती करत असताना एका कंत्राटी कर्मचारी खाली पडून जखमी झालेला आहे. जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांचे नाव अफरोज शेख असून त्याला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सेफ्टी बेलट न घातल्यामुळे अफरोज खाली पडल्याचे बोलण्यात येत आहे. माटूंगा रेल्वे कारशेडमध्ये छताची दुरुस्तीचे काम तीन कंत्राटी कर्मचारी करत होते. त्यांनी सर्वांनी सेफ्टी बेल्ट घातला होता. 

मात्र एक कर्मचारी घसरून पडला . त्याला तात्काळ सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. असून त्याची प्रकृती स्थिर आहे अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान माटूंगा वर्कशॉपमध्ये करताना ५० फूट उंचीवरून एक कर्मचारी खाली पडला त्यांना सेफ्टी बेल्ट सारख्या सुविधा देण्यात आल्या नव्हत्या असा आरोप काही कर्मचाऱ्यांनी केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com