पुण्यानंतर मुंबईतही गोळीबार! माटुंग्यामध्ये दिवसाढवळ्या ज्वेलर्सवर 5-6 राऊंड फायरिंग; नेमकं काय घडलं?

Matunga Firing: मुंबईत माटुंगा परिसरात दिवसाढवळ्या ज्वेलर्सच्या दुकानावर ५ ते ६ राऊंड फायरिंग करण्यात आल्याची माहिती आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
Matunga Firing

Matunga Firing

ESakal

Updated on: 

मुंबई : माटुंग्यातील पी. सी. जैन ज्वेलर्सवर बुधवारी पाच ते सहा गोळ्या झाडण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रहदारीच्या मुख्य रस्त्यावर शोभा हॉटेलच्या बाजूला असलेल्या या ज्वेलर्सवर संध्याकाळच्या सुमाराला गोळीबार झाला. त्यानंतर परिसरात घबराट पसरून पळापळ उडाली. दुकानदारांनी धडाधड दुकाने बंद केली.

Loading content, please wait...