

Demand to raise minority education loan limit to ₹20 lakh.
Sakal
मुंबई : मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या विविध योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी तसेच अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थी, छोटे व्यावसायिक आणि गरजू नागरिकांना आर्थिक आधार मिळावा, यासाठी महामंडळाचे संचालक सलीम सारंग यांनी आज उपमुख्यमंत्री तथा अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन महत्त्वपूर्ण मागण्या मांडल्या. यावेळी महामंडळाचे संचालक डॉ. असगर मुकादम आणि अल्ताफ पावेकर हेही उपस्थित होते.