.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, मिरा-भाईंदर, वसई-विरार येथील प्रशासकीय राजवट संपुष्टात आली. येथे महापौर-उपमहापौरांची निवड मंगळवारी करण्यात आली. आता संबंधित शहरांतील या महत्त्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधींच्या हाती सोपविण्यात आला आहे. महामुंबईतील पाच महापालिकांत आज महापौरांची निवड करण्यात आली. पाचपैकी चार महापालिकांत महिला महापौर विराजमान झाल्या आहेत. ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, मिरा-भाईंदर, वसई-विरार या पाच महापालिकांत महापौरपदासोबतच उपमहापौरपदांवरही निवड करण्यात आली. तीन ठिकाणी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे, एका ठिकाणी भाजपचा, तर एका ठिकाणी बहुजन विकास आघाडीचा महापौर झाला.