

Bombay High Court
esakal
मुंबई क्रिकेट असोसिएशनला आणि महाराष्ट्र FDA यांच्यातील न्यायालयीन लढाईत मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईच्या वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील MCA क्लबच्या स्वयंपाकघरावर लादलेली बंदी उठवण्याचा मार्ग आता FDA साठी मोकळा झाला आहे. न्यायालयाने ही बंदी उठवण्याचे आदेश दिले आहेत. FDA ने यापूर्वी २० ऑगस्ट रोजी MCA क्लबच्या स्वयंपाकघराची तपासणी केली होती. त्यावेळी स्वयंपाकघराला ११० पैकी ८७ गुण मिळाले होते.