

Meenakshi Shinde quits shinde shivsena
ESakal
ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या विश्वासू समजल्या जाणाऱ्या माजी महापौर आणि महिला जिल्हा संघटक मीनाक्षी शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या जी राजकीय परिस्थिती आहे, त्यासाठी आपण काम करण्यास असमर्थ असल्याचे कारण देत त्यांनी हा राजीनामा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना दिला आहे.