Mega Block : हार्बर मार्गावर २२ दिवस मेगाब्लॉक! लोकल वाहतुकीत होणार बदल

हार्बर मार्गावरील पनवेल स्थानकावर समर्पित फ्रेट कॉरिडॉरच्या कामासाठी २ ऑक्टोबरपर्यत रात्रकालीन मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला.
mumbai local mega block
mumbai local mega blocksakal

मुंबई - हार्बर मार्गावरील पनवेल स्थानकावर समर्पित फ्रेट कॉरिडॉरच्या कामासाठी २ ऑक्टोबरपर्यत रात्रकालीन मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा ब्लॉक आणखी २२ दिवस चालणार आहे. त्यामुळे हार्बर मार्गावर उशिरा सुटणाऱ्या काही लोकल सेवा शॉर्ट टर्मिनेट करण्यात येणार आहे.

ग्रेटर नोएडातील दादरीपासून ते मुंबईतील जवाहरलाल नेहरू बंदरापर्यंत (जेएनपीटी) मालवाहतुकीसाठी सर्वत्र रेल्वे मार्गिका टाकण्याचा प्रकल्प डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन लिमिटेडने हाती घेतला आहे. याच प्रकल्पाचा एक भाग म्हणून दोन नवीन ट्र्क पनवेल स्टेशन यार्डमधून जाण्याचे नियोजित आहे.

त्याचाच एक भाग म्हणून पनवेल ईएमयू उपनगरीय स्टॅबलिंग लाईन्समध्ये बदल करण्यात येणार आहे. त्यामुळे या कामासाठी १८ ऑगस्ट २०२३ पासून दररोज तीन ते चार तासांचा रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येत आहे. जवळपास ४५ दिवस काम सुरू असणार आहे.

ते बहुधा २ ऑक्टोबरपर्यत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. याकरिता ११ सप्टेंबरपासून ब्लॉक रात्री साडे बारा ते पहाटे साडे पाच वाजेपर्यत घेण्यात येणार आहे. त्यामुळे लोकलच्या वाहतुकीत मोठे बदल केले आहे.

शेवटीची लोकल -

  • सीएसएमटी-पनवेल शेवटची लोकल रात्री १०.५८ वाजता

  • ठाणे-पनवेल शेवटची लोकल रात्री ११.३२ वाजता

  • पनवेल-ठाणे शेवटची लोकल रात्री १०.१५वाजता

पहिली लोकल -

  • सीएसएमटी-पनवेल पहिली लोकल पहाटे- ४.३२ वाजता

  • पनवेल स्थानकातून सीएसएमटीकरिता पहिली लोकल पहाटे ५.४०वाजता

  • ठाणे-पनवेल पहिली लोकल सकाळी ६.२०वाजता

  • पनवेल-ठाणे पहिली लोकल पहाटे- ६.१३ वाजता

या लोकल रद्द -

  • सीएसएमटी-पनवेल रात्री-११.१४, १२.२४,पहाटे-५.१८,सकाळी- ६.४० या लोकल रद्द

  • पनवेल-सीएसएमटी रात्री- ९.५२,१०.५८, पहाटे-४.०३,५.३१ या लोकल रद्द

  • ठाणे-पनवेल-नेरुळ रात्री- ९.३६,१२.०५,पहाटे-५,१२,५,४० या लोकल रद्द

  • पनवेल-ठाणे रात्री -११.१८,पहाटे- ४.३३, ४.५३ या लोकल रद्द

शॉर्टटर्मिनेट -

  • सीएसएमटी-पनवेल रात्री- ११.३०, ११.५२, १२,१३,१२.४० या लोकल बेलापुर पर्यत धावतील आणि तेथूनच सीएसएमटीकडे रवाना होतील.

  • वडाळा-बेलापुर रात्री १२.५०ची लोकल वाशी पर्यत धावणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com