Mega Block : तिन्ही मार्गावर रविवारी मेगाब्लॉक: प्रवाशांचे होणार हाल!

उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी १० डिसेंबर २०२३ रोजी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
Mumbai Mega Block
Mumbai Mega Blocksakal

मुंबई - उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी १० डिसेंबर २०२३ रोजी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण अप- डाऊन जलद मार्गावर तर हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशी अप- डाऊन मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल ते माहीम अप- डाऊन जलद मार्गावर शनिवारी- रविवारी मध्य रात्री मेगाब्लॉक असणार आहे.

मध्य रेल्वे -

कुठे- ठाणे- कल्याण अप - डाऊन जलद मार्गावर

कधी- सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० वाजेपर्यंत

परिणाम -

या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या डाऊन जलद लोकल सेवा ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि त्यांच्या संबंधित थांब्यांनुसार कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर थांबून आपल्या गंतव्यस्थानी १० मिनिटे उशीराने पोहचतील.

कल्याण येथून सुटणाऱ्या अप जलद लोकल सेवा कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर त्यांच्या संबंधित थांब्यांव्यतिरिक्त वळवण्यात येतील आणि दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांदरम्यान थांबून पुढे मुलुंड स्थानकावर अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि आपल्या गंतव्यस्थानी १० मिनिटे उशीराने पोहचतील.

हार्बर मार्गावर

कुठे- कुर्ला ते वाशी अप- डाऊन हार्बर मार्गावर

कधी- सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यत

परिणाम -

या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून वाशी/बेलापूर/पनवेलसाठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल/बेलापूर/वाशी येथून सीएसएमटीसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी आणि कुर्ला तसेच पनवेल आणि वाशी दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरूळ स्थानकावरून प्रवास करण्याची परवानगी आहे.

पश्चिम रेल्वे -

कुठे - मुंबई सेंट्रल ते माहीम अप- डाऊन जलद मार्गावर

कधी - रात्री ११ ते पहाटे ४ वाजेपर्यत

परिणाम -

या ब्लॉकदरम्यान अप-डाउन जलद मार्गावरील लोकल सेवा सांताक्रुझ ते चर्चगेट स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत. काही लोकल गाड्या ब्लॉक दरम्यान रद्द असणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com