
मुंबई : मुंबईची लाईफलाईन, उपनगरीय रेल्वे नेटवर्कला या रविवारी मोठा अडथळा येणार आहे. मुंबई लोकल प्रशासनाकडून मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभाल कामांसाठी मध्य आणि हार्बर मार्गांवर रविवार ७ सप्टेंबर रोजी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.