

मुंबई - जपानमध्ये मागील अनेक वर्षांपासून राहत असलेल्या मराठी भाषिकांकडून मराठी भाषा आणि तिच्या प्रसारासाठी विविध प्रकारचे उपक्रम चालवले जातात, तसेच मराठीच्या संस्कृतीसाठी विविध प्रकारच्या कार्यक्रमचे आयोजन केले जाते.
त्याच पार्श्वभूमीवर आज राज्य मराठी भाषा विकास, शालेय शिक्षण आणि जापानमधील एदोगावा इंडिया कल्चरल सेंटर (एदोगावा भारतीय सांस्कृतिक कलामंदिर), टोक्यो मराठी मंडळासोबत आज मंत्रालयात सामंजस्य करार करण्यात आला.
यावेळी मराठी भाषा विकास व शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्यासह एससीईआरटीचे संचालक अमोल येडगे, बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील, यांच्यासह एदोगावा भारतीय सांस्कृतिक कलामंदिर टोकीओचे प्रमुख आणि जापानमधील आमदार योगेंद्र पुराणिक, विनयकुमार आवटे, गौरव फुटाणे आदींच्या उपस्थितीत या करारावर सह्या करण्यात आल्या.
जपानमधील मराठी भाषिकांना एकत्र आणण्याकरिता व मराठी भाषा आणि संस्कृतीच्या जतनाकरिता एदोगावा भारतीय सांस्कृतिक कलामंदिर, टोक्यो मराठी मंडळ व इतर संस्था मागील अनेक वर्षांपासून कार्यरत असून या करारामुळे मराठी भाषेच्या प्रसारासाठी मोठे बळ मिळेल असा विश्वास पुराणिक यांनी व्यक्त केला.
या कराराच्या माध्यमातून राज्य शिक्षण मंडळाची मराठी माध्यमातील पुस्तके ही जापानमध्ये मराठी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मि्ळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच यात जपान मधील गरजे प्रमाणे पाठ्यपुस्तकांत २० टक्के बदल करण्याची मुभा मिळणार आहे.
जे विद्यार्थी येथील मराठी आणि राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम पूर्ण करून परीक्षा देतील त्यांना महाराष्ट्र राज्य सरकारकडून प्रमाणपत्रे दिले जातील. तसेच जापानमधील शिक्षकांना आवश्यकतेनुसार प्रशिक्षण दिले जाईल.
मराठी बांधव आणि मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी जपान मध्ये वाचनालय तय्यार करण्याकरिता वेगवेगळ्या वयोगटाकरिता पुस्तके प्रदान केले जातील.
यासोबत महाराष्ट्रातील राजनेते व शासकीय अधिकारी यांची जपान दौऱयामध्ये एदोगावा भारतीय सांस्कृतिक कलामंदिर व इतर संबंधीत स्थळांना भेट देऊन, याद्वारे विचारांची देवाण-घेवाण करावी व मराठी बांधवांना प्रोत्साहन देण्यासाठीही या करारात उल्लेख करण्यात आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.