ऐन गर्दीच्या वेळी एसी लोकलच्या टपावर तरुणाचा थरारक प्रवास, वाहतूक कोलमडली, रेल्वे स्थानकावर प्रवाशांचा खोळंबा; Video Viral
Kalyan Youth Climb On AC Local: विठ्ठलवाडी ते कल्याण दरम्यान एक तरुण एसी लोकल ट्रेनच्या छतावर चढल्याची घटना घडली. यामुळे कल्याण रेल्वे स्थानकावर प्रवाशांचा खोळंबा झाला.
मुंबई : विठ्ठलवाडी ते कल्याण दरम्यान थरारक प्रकार घडला आहे. एसी लोकल ट्रेनच्या छतावर एक तरुण चढल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये वाहतूक कोलमडली असून रेल्वे स्थानकावर प्रवाशांचा खोळंबा झाला.