

NCP Merger Issue Closed, Clarifies Shashikant Shinde Amid Political Buzz
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या बाबत पुन्हा सुरू झालेल्या चर्चांना राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी आज पूर्णविराम दिला. ‘‘विलीनीकरणाचा विषय संपलेला असून त्यावर यापुढे कोणतीही चर्चा होणार नाही. आम्ही सक्षमपणे स्वतंत्र पक्ष म्हणून शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही वाटचाल करणार आहोत,’’ असे शशिकांत शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.