

Maharashtra Weather News
ESakal
हवामान विभागाने आज (८ जुलै) पासून पुढील पाच दिवसांसाठी मुंबई, मुंबई उपनगरे, ठाणे आणि नाशिकसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पालघर, रायगड, नाशिक घाट, पुणे घाट आणि सातारा घाटांसाठी रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. मुंबईत काही मिनिटांच्या पावसानेच यंत्रणेची कसोटी घेतली. किंग सर्कल परिसरात, पाऊस सुरू झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच रस्ते पाण्याखाली गेले.