
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तर मागील तीन दिवसांपासून मुंबईत पावसाची संततधार कोसळत असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच पावसाचा फटका रेल्वे आणि रस्ते वाहतुकीला देखील पडला आहे. यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान हवामान विभागाने बुधवार २० ऑगस्ट रोजी देखील अतिवृष्टीचा इशारा जारी केला आहे.