
Maharashtra Weather Update
ESakal
मुंबई : मागील दोन दिवसांपासून राज्यभरात पावसाने धुमाकूळ घातला आहे. आज पहाटेपासूनही मुंबईसह उपनगर जिल्ह्यात तसेच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे अनेक सखल भागात पाणी साचले असून रस्ते, नदी नाल्यांनी देखील धोक्याची पातळी पार केली आहे. परिणामी नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून आहे आहे.