

Mumbai Rain Alert for 4 days
ESakal
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात गेल्या आठवड्यापासून पाऊस कोसळत आहे. रविवारी देखील मुंबईत अनेक भागात पावसाच्या मुसळधार सरी कोसळत होत्या. मान्सून संपला असला तरीही पाऊस कोसळत असून हा पावसाळी हंगाम पुढील चार दिवस असाच सुरु राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.