
Mumbai Weather Update
ESakal
मुंबई : सध्या अरबी समुद्रात निर्माण झालेल्या शक्ती चक्रीवादळाचे संकट घोंघावत आहे. यामुळे ७ ऑक्टोबरपर्यंत हवामान विभागाने किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज दिला आहे. मागील दोन दिवसांपासून मुंबई शहरासह उपनगर जिल्ह्यात पावसाची ये-जा सुरु असल्याचे दिसून येत आहे. तर आजही म्हणजेच मंगळवार (ता. ७) रोजी हवामान विभागाने पावसाचा अलर्ट जारी केला आहे.