

Maharashtra Wheather Update
ESakal
मुंबई : काहीशी विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. गुरुवार मध्यरात्रीपासून शुक्रवार सकाळच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या मुसळधार सरी कोसळत होत्या. दरम्यान, हवामान विभागाने मुंबईत पावसाची अंदाज देत परिणामी वाहतुकीला फटका बसणार असल्याची शक्यता वर्तवली आहे.