Mumbai Rain: मुंबईत संततधार! पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट; शाळा आणि महाविद्यालये बंद राहणार? महत्त्वाची अपडेट समोर

Mumbai Rain Update: मुंबईत पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. या दरम्यान शाळा आणि महाविद्यालये बंद राहणार का, याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
Mumbai Rain

Mumbai Rain Update

ESakal

Updated on

Mumbai Rain: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई शहरासह उपनगरात पावसाच्या संततधार कोसळत असल्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच रस्ते, रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले आहेत.हवामान विभागाने मुंबईत ऑरेंज अलर्ट जारी केला असून तीन दिवस मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यामुळे शाळा बंद राहणार का? असा प्रश्न विद्यार्थ्यांसह पालकांना पडत असून याबाबत महत्त्वाचे अपडेट समोर आले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com