

Mumbai Weather
ESakal
मुंबई : मुंबईत सध्या उन्हाचा तडाखा जाणवत असतानाच आता मुंबईकरांना दुहेरी संकटांचा सामना करावा लागणार आहे. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) पुढील दोन दिवस मुंबईसह ठाणे आणि पालघर परिसरात उष्ण आणि दमट हवामानासह हलक्या पावसाचा इशारा दिला आहे. यामुळे वातावरणात प्रचंड उकाडा वाढून मुंबईकरांना घाम फुटणार आहे.