Mhada
Esakal
मुंबई : जोगेश्वरीच्या पीएमजीपी वसाहतीचा म्हाडाकडून पुनर्विकास केला जाणार आहे. त्यानुसार नव्याने उभा राहणाऱ्या पुनर्विकसित इमारतीत रहिवाशांना वाढीव क्षेत्रफळाच्या सदनिका दिल्या जाणार आहेत. त्यानुसार कायमस्वरूपी पर्यायी सदनिका करारनामा करताना मुद्रांक शुल्क विभागाकडून लावले जाणारे दीड-दोन लाख रुपयांचे शुल्क माफ होणार आहे. नाममात्र शुल्क घेऊन नोंदणी केली जाणार आहे. त्याबाबत प्रस्ताव म्हाडाने महानिरीक्षक मुद्रांक शुल्क विभाग पुणे यांना दिला आहे. त्यामुळे रहिवाशांना दिलासा मिळणार आहे.