डोंबिवलीतील एम.आय.डी.सी. परिसर कचरामुक्त होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai

डोंबिवलीतील एम.आय.डी.सी. परिसर कचरामुक्त होणार

sakal_logo
By
शर्मिला वाळुंज

डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसी परिसरात सर्वत्र कचरा पसरलेला असतो. मात्र आता कंपन्यांतील कचरा व इतर कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी खासगी संस्था नेमणे, रस्त्यावर कचरा फेकणाऱ्यां विरोधात कायदेशीर कारवाई करण्यासाठी भरारी पथक नेमणे याबरोबरच आठवडी बाजार बंद करणे याविषयीची बैठक झाली असून हा परिसर लवकरच कचरा मुक्त करण्याच्या दृष्टीने काम केले जाणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

डोंबिवली एमआयडीसी परिसरात अनेक ठिकाणी कचरा पडलेला दिसतो. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची सूचना पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांना दिली होती. त्याअनुषंगाने गुरुवारी कामा संघटनेच्या कार्यालयात एक बैठक पार पडली. यावेळी कामा संघटनेचे अध्यक्ष देवेन सोनी, एम.आय.डी.सी.चे उप अभियंता पतंगे, महापालिका घनकचरा विभागाचे उपआयुक्त रामदास कोकरे, ई प्रभागाचे सहाय्यक आयुक्त भारत पवार, नरेंद्र धोत्रे, अनिकेत धोत्रे आदी उपस्थित होते.

हेही वाचा: डोंबिवली : बाळाची परस्पर खरेदी विक्री प्रकरणी डॉक्टर सह आई वडिलांवर गुन्हा दाखल

एमआयडिसी क्षेत्रात पडणारा डोमेस्टिक वेस्ट, कंपन्यातील ड्राय वेस्ट यासोबत झाडांचा पालापाचोळा यांची विल्हेवाट लावण्यासाठी खाजगी संस्था नेमणे व रस्त्यावर कचरा टाकणा-या नागरिकांविरूध्द कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्याकरीता संयुक्तिक भरारी पथक नेमणे व कचरा निर्माण करणारे आठवडे बाजार बंद करणे इत्यादी बाबींवर महत्वपूर्ण चर्चा घडून आली. एमआयडीसी भागातील इंडस्ट्री मधील प्लास्टिक, कागद इ. सुका कचरा महानगरपालिकेने नियुक्त केलेल्या संस्थेमार्फत उचलण्यात येईल, जेणेकरून महापालिकेवरील ताण कमी होईल. दर 15 दिवसांनी संयुक्त बैठक घेऊन आढावा घेण्यात येईल, असाही निर्णय सदर बैठकीत घेण्यात आला आहे. यामुळे आता हा परिसर कचरा मुक्त होईल असा विश्वास यावेळी पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

loading image
go to top