Lockdown : स्थलांतरीत अडकले महाराष्ट्राच्या सीमेवर, वाहनांच्या रांगा

सकाळ वृत्तसेवा
Monday, 18 May 2020

महाराष्ट्रातून गुजरातमध्ये जाणाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे. गुजरात सीमेवर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. ते आवश्यक कागदपत्रांसाठी प्रयत्नांची शर्थ करीत आहेत.

मुंबई : महाराष्ट्रातून गुजरातमध्ये जाणाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे. गुजरात सीमेवर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. ते आवश्यक कागदपत्रांसाठी प्रयत्नांची शर्थ करीत आहेत. त्याचवेळी या वाहनात कुठेतरी स्थलांतरीत हरवलेले आहेत. पोलिसाची परवानगी नसल्यामुळे त्यांच्यापैकी अनेकांना चार दिवस या सीमेजवळ थांबणे भाग पडले आहे.

नक्की वाचा : "माझी सगळी संपत्ती पोरीच्या नावावर करा" - जितेंद्र आव्हाड

महाराष्ट्राची सीमा पार करणाऱ्यांना पोलिस प्रमाणपत्र अत्यावश्यक आहे. अनेकांकडे वैद्यकीय प्रमाणपत्र आहे, पण ते पुरेसे नाही. आपण अन्य राज्यात जाताना कोणत्या वाहनाने जाणार हेही सांगणे आवश्यक असते. स्थलांतरीत मिळेल त्या वाहनाने जाण्याचा प्रयत्न करतात. वाहनाची माहीती दिल्याशिवाय परवानगी मिळत नाही असा स्थलांतरीतांचा दावा आहे. मात्र पोलिसांनी या प्रकारची कोणतीही सक्ती केली जात नसल्याचे सांगितले. वाहन नसेल त्यांच्या जाण्याच्या व्यवस्था संबंधित राज्याने करावी हा नियम आहे आणि त्याची अंमलबजावणी होत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Big News - क्या बात हैं ! प्लाझ्मा थेरपी अखेर यशस्वी, नायरमधील रुग्णाच्या तब्येतीत सुधारणा

स्थलांतरीतांना हे मान्य नाही. आम्ही तीन चार दिवसांपासून येथे अडकलो आहोत असा त्यांनी दावा केला. महाराष्ट्रात आम्हाला काही काम नाही, आम्ही थांबून काय करणार अशी विचारणा त्यांनी केली, त्याचवेळी पोलिस आम्हाला साह्य करीत नाहीत, असा त्यांनी दावा केला. काहींनी मिनी व्हॅनद्वारे जाण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी 35 ते 40 हजार दिल्याचे सांगितले जात आहे. मात्र काही स्थलांतरीतांनी आमच्याकडे एवढे पैसे असते तर आम्ही कशाला मुंबई सोडले असते अशी विचारणा केली. 

महत्वाची बातमी : सारखा मास्क लावल्याने आपणच उत्सर्जित केलेला कार्बन डायऑक्सिइड घेतला जातो आणि होतोय हायपोक्सिया?

महाराष्ट्राच्या बसमधून जाण्याची रांग खूप मोठी आहे. आम्हाला एकाच राज्याची सीमा पार करायची आहे, त्यामुळे चालत जाण्याचे ठरवले, पण येथे अडकून पडलो आहोत. आता राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहारला निघाले आहेत, त्यांचे काय झाले असेल कोणास ठाऊक असे काहींनी हताशपणे सांगितले. तर मूळचे चेन्नईचे आणि राजस्थानात काम करणाऱ्यांनी पोलिस स्टेशनसमोरील रांग कमीच होत नसल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सुरुवातीचे काही दिवस रांग कधी संपणार हाच प्रश्न आम्हाला पडत असे, पण आता रांग आवाक्यात आली आहे असे सांगितले.

Migrants stranded on the Maharashtra border, long queues of vehicles


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Migrants stranded on the Maharashtra border, long queues of vehicles