esakal | कोरोनामुळे ठाण्यातील कामगार वसाहतीचे स्थलांतर 
sakal

बोलून बातमी शोधा

सिव्हिल रुग्णालय परिसरातील कामगारांची वसाहत

ठाणे जिल्ह्यात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्हा सामान्य (सिव्हील) रुग्णालय हे पूर्णतः कोविड-19 म्हणून कार्यान्वित करण्यात आले; मात्र, याचा फटका सिव्हील रुग्णालयाच्या आवारात असलेल्या चतुर्थ श्रेणी कामगारांच्या वसाहतीला बसण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. खबरदारी म्हणून या कुटुंबाना स्थलांतर करण्याबाबतच्या नोटिसा बजावण्यात आल्याचे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले. 

कोरोनामुळे ठाण्यातील कामगार वसाहतीचे स्थलांतर 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ठाणे : ठाणे जिल्ह्यात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्हा सामान्य (सिव्हील) रुग्णालय हे पूर्णतः कोविड-19 म्हणून कार्यान्वित करण्यात आले; मात्र, याचा फटका सिव्हील रुग्णालयाच्या आवारात असलेल्या चतुर्थ श्रेणी कामगारांच्या वसाहतीला बसण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. खबरदारी म्हणून या कुटुंबाना स्थलांतर करण्याबाबतच्या नोटिसा बजावण्यात आल्याचे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले. 

जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा नव्वदीपार पोहचला आहे. येथील सर्वच रुग्णांचा भार मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयावर येऊ नये, तसेच जिल्ह्यात आढळून येणाऱ्या कोरोना संशयित रुग्णांवर तातडीने उपचार व्हावेत, यासाठी शनिवारपासून (ता. 4) जिल्हा सामान्य रुग्णालय हे पूर्णतः कोविड - 19 म्हणून कार्यान्वित करण्यात आले. सद्यस्थितीत सिव्हीलमध्ये 250 कोरोना बेडची व्यवस्था करण्यात आली असून मोठ्या प्रमाणात जिल्हाभरातून संशयित रुग्ण दाखल केले जात आहेत. 

क्लिक करा - हिच खरी माणूसकी: मुस्लिमांच्या पुढाकाराने हिंदू महिलेवर अंत्यसंस्कार 

दरम्यान, सिव्हीलच्या आवारातच तळ अधिक एक मजली दोन आणि बैठी चाळ अशा जुन्या वसाहतीतील 21 घरांमध्ये रुग्णालयाचे 16 कर्मचारी अनेक वर्षांपासून वास्तव्य करीत आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर या वसाहतीतील कामगारांना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलाश पवार यांनी 4 एप्रिलला 24 तासात घरे रिकामी करून स्थलांतर करण्याबाबत नोटिसा बजावल्याने ऐन संचारबंदीतच त्यांच्यावर स्थलांतराची टांगती तलवार आहे.

क्लिक करा - बहिणीने भावाला घरातच केले बंदिस्त 

त्यामुळे कुटुंब काबिल्यासह कसे आणि कुठे स्थलांतर करणार, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. दरम्यान, या कामगारांची गैरसोय होऊ नये, यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून ठाणे महापालिकेच्या अखत्यारितील रेंटल इमारती अथवा अन्य इमारतींचा पर्याय सुचवून या कुटुंबांची व्यवस्था करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहेत. 

दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून ही वसाहत सिव्हिलच्या आवारातच दाटीवाटीने वसल्याने येथील कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना कोरोनाची लागण होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. दक्षता म्हणून स्थलांतर करण्याची सूचना दिली आहे. त्याचप्रमाणे सिव्हिलच्या सर्व कर्मचाऱ्यांची योग्यप्रकारे काळजी घेत असून स्थलातरीत कामगारांनाही सोई-सुविधायुक्त घरे देण्याचा प्रयत्न करत आहोत. 
- डॉ. कैलास पवार, 
जिल्हा शल्यचिकित्सक 

loading image
go to top