esakal | उल्हासनगरमध्ये लाखोंचा गुटखा जप्त 
sakal

बोलून बातमी शोधा

हस्तगत केलेला गुटखा दाखवताना पोलिस.

महाराष्ट्रामध्ये गुटखा बंदी असताना, गुजरातमधून मोठ्या ट्रकने गुटखा वसईमध्ये उतरवून छोट्या-छोट्या मालवाहू वाहनाने वसई-भिवंडी-कल्याणमार्गे तो उल्हासनगरमध्ये विक्री करण्याचा डाव पोलिसांनी हाणून पाडला आहे. सोमवारी (ता. 27) सकाळी नऊच्या सुमारास कल्याणमधील दुर्गाडी चौकात सुमारे 600 किलोचा गुटखा (किंमत 5 लाख) जप्त करण्यात कल्याण वाहतूक पोलिसांना यश आले आहे. 

उल्हासनगरमध्ये लाखोंचा गुटखा जप्त 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कल्याण : महाराष्ट्रामध्ये गुटखा बंदी असताना, गुजरातमधून मोठ्या ट्रकने गुटखा वसईमध्ये उतरवून छोट्या-छोट्या मालवाहू वाहनाने वसई-भिवंडी-कल्याणमार्गे तो उल्हासनगरमध्ये विक्री करण्याचा डाव पोलिसांनी हाणून पाडला आहे. सोमवारी (ता. 27) सकाळी नऊच्या सुमारास कल्याणमधील दुर्गाडी चौकात सुमारे 600 किलोचा गुटखा (किंमत 5 लाख) जप्त करण्यात कल्याण वाहतूक पोलिसांना यश आले आहे. 

कल्याण वाहतूक पोलिस विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुखदेव पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण पश्‍चिम दुर्गाडी चौक परिसरात पोलिस हवालदार ओ. जी. उतेकर, पोलिस नाईक डी. बी. हालसे, वॉर्डन सागर कांबळे, वॉर्डन जाधव आदींचे पथक रविवार रात्रीपासून वाहतूक नियमन करीत होते.

सीएए, एनपीआरबाबत काँग्रेसकडून अपप्रचार ः डावखरे

सोमवारी सकाळी 9 च्या सुमारास भिवंडीहून कल्याणकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतुकीचे नियमन करीत असताना टेम्पोचा (क्र. एमएच 48 ओवाय 7211) संशय वाहतूक शाखेचे पोलिस हवालदार उतेकर यांना आल्याने त्यांनी तपासणी केली असता, चालक बापुसाहेब कराळे (38, वसई) उडवाउडवीचे उत्तरे दिली. 

त्यामुळे संशय अधिक बळावल्याने वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुखदेव पाटील आणि वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त दत्तात्रय निघोट यांनी घटनास्थळी धाव घेत बाजारपेठ पोलिस ठाण्यात कळविले. बाजारपेठ पोलिस ठाण्याचे अधिकारी, वाहतूक पोलिस यांनी सदर वाहनाची तपासणी केली असता, दंगल (केसर मिश्रीत) सुमारे 600 किलोचा गुटख्याचा साठा आढळून आला.

शरद पवार आमचे विठ्ठल ः संजय राऊत

याबाबत अन्न व औषध ठाणे विभागाने बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गुटखा विक्री करणाऱ्यांविरोधात सातत्याने कारवाई सुरू असून आगामी काळात पोलिस, पालिका आणि अन्न व औषध विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कारवाई केली जाईल, अशी माहिती ठाणे विभाग सहाय्यक आयुक्त धनंजय कडगे यांनी दिली. 

loading image