मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात एक पानी प्रतिज्ञापत्र केला सादर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात एक पानी प्रतिज्ञापत्र केला सादर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : एनसीबीचे विभागिय संचालक समीर वानखेडे यांच्यासंबंधी केलेले ट्विट मधील कागदपत्रे पडताळणी केली आहे असा दावा आज मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात एक पानी प्रतिज्ञापत्रात केला आहे.

नवाब मलिक यांनी गुरुवारी एक पानी प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले. त्या प्रतिज्ञापत्रानुसार, मुंबई महानगर पालिकेच्या ई-वॉर्डमधून समीर यांच्या जन्मदाखल्याची सत्यता पडताळली होती. तसेच, समीर यांच्या पहिल्या पत्नीच्या निकटवर्तीय नातेवाईककडून त्या दोघांच्या निकाहनाम्याची प्रत मिळाली आहे, असे स्पष्ट केले आहे. तसेच, मलिक यांनी केलेले आणखी एक ट्वीट हे वानखेडेंच्या कुटुंबीयांच्या सोशल मीडिया खात्यांवरून मिळवले होते, असा पुनरुच्चारही या प्रतिज्ञापत्रात करण्यात आला आहे. सदर याचिकेवर शुक्रवारी सुनावणी पार पडणार आहे.

हेही वाचा: इलॉन मस्क यांनी पाळला शब्द; ट्विटर पोलनंतर विकले ११० कोटी रुपयांचे शेअर्स

मलिक यांनी केलेली ट्विट खोटी आहेत हे सिध्द करा असे निर्देश न्यायालयाने ज्ञानदेव वानखेडे यांना दिले आहेत. वानखडे यांनी केलेल्या मानहानीच्या दाव्यावर उद्या सुनावणी होणार आहे.

loading image
go to top