उदय सामंत यांची पत्रकार परिषद, विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी

उदय सामंत यांची पत्रकार परिषद, विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी

मुंबईः विद्यापीठ अंतिम वर्षाच्या परिक्षेबाबत काल उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली आहे. बहुतांश विद्यापीठांनी परीक्षेसाठी ३१ ऑक्टोबरची मुदतवाढ मागितली असल्याची माहिती यावेळी सामंत यांनी दिली आहे. तसंच यंदा कमी गुणांची परीक्षा घेण्यात येणार असल्याचं सामंत यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. 

विद्यार्थी घराबाहेर पडून परीक्षा देणार नसून यावर सरकार ठाम आहोत.  आज यासंदर्भात नेमलेल्या समितीने आपला अहवाल दिला असून विद्यार्थ्यांना घराबाहेर न पडता परीक्षा घ्यायची यावर सर्व कुलगुरूंचं एकमत झालं असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. तसंच बहुतांश विद्यापीठांनी अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी मुदतवाढ मागितली आहे. त्यामुळे यासंदर्भात २ सप्टेंबरला आप्तकालीन व्यवस्थापनाची बैठक लावून मुदत वाढीसाठी यूजीसीकडे विनंती करणार असल्याचं उदय सामंत यांनी सांगितलं आहे. 

कोरोनासारख्या या संकटाच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांना कमी त्रास देऊन घरातल्या घरात परीक्षा देता येईल, यासाठी आमचे प्रयत्न सुरु असल्याचंही त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.

अंतिम वर्षाच्या परीक्षासंदर्भात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली परीक्षेचा निर्णय घेणारी एक समिती राज्य सरकारने गठित करण्यात आली. या समितीत दोन संचालक आहेत.  या समितीने अहवाल तयार केला आहे. त्यांच्याशी बैठक घेऊन परिक्षा कशी घ्यायची हे ठरवलं जाईल, असं सामंत म्हणाले. तसंच या समितीची आज बैठक पार पडली. या बैठकीत बहुतांश विद्यापीठांच्या कुलगुरुंनी परीक्षेसाठी मुदतवाढ मागितली असल्याचं सामंत म्हणालेत. कुलगुरूंनी आणखी एक दिवस नियोजनासाठी मागितला असल्यानं परवा संध्याकाळी ४ वाजता अंतिम निर्णय आम्ही मुख्यमंत्र्यांकडे देणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

२ सप्टेंबरला होणाऱ्या बैठकीत वेळापत्रकाबाबत आखणी करु आणि त्याची माहिती मुख्यमंत्र्यांना देऊ. यंदा कमी गुणांची परीक्षा असेल जेणेकरुन विद्यार्थ्यांवर जास्त ताण येणार नाही. ऑनलाईन परीक्षेमध्येही अनेक प्रकार आहेत. MCQ, OMR किंवा असाईनमेंट पद्धतीमधून परीक्षा घेता येईल का याबाबत चर्चा करुन निर्णय घेऊ, असंही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.

minister uday samant final year exam press conference latest update  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com