निधी मंजुरीसाठी मागितली लाच, ६ लाखांची रोकड स्वीकारताना मंत्रालयातला अधिकारी अडकला सापळ्यात; खारघरमध्ये रंगेहाथ पकडलं

Maharashtra Ministry Bribe Case मंत्रालयातला अधिकारी विलास लाड याला एसीबीने लाखोंची लाच घेताना अटक केलीय. खारघर परिसरात त्याला रंगेहाथ पकडण्यात आलं आहे. निधीला मंजुरी देण्यासाठी त्याने लाचेची मागणी केली होती.
Corruption Case Shocks Maharashtra Ministry

Corruption Case Shocks Maharashtra Ministry

Esakal

Updated on

मंत्रालयात नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपिकानं २५ हजारांची लाच घेतल्याचा प्रकार घडल्यानंतर मंत्रालयातील लाचखोरीचा मुद्दा समोर आला होता. यानंतर आता मंत्रालयातल्याच एका अधिकाऱ्याला एसीबीने लाच घेताना अटक केलीय. खारघर परिसरात लाखोंची लाच घेताना अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडण्यात आलंय. निधी मंजूर करून घेण्यासाठी त्याने लाचेची मागणी केली होती अशी तक्रार एसीबीकडे देण्यात आली होती. त्यानंतर एसीबीने सापळा रचून लाचखोर अधिकाऱ्याला अटक केली. Maharashtra officer caught red handed with cash during ACB operation

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com