matheran
matheranmatheran

Mumbai News : माथेरानच्या राणीचा डबा घसरला!

अपघात कोणतही जिवीतहानी नाही!

मुंबई : पर्यटकांचे खास आकर्षण असणारी माथेरानची राणी असलेली मिनीट्रेनचा सोमवारी सकाळी अपघाता झालेला आहे. अमन लाज ते माथेरान दरम्यान मिनी ट्रेन रेल्वे रुळावरून घसरली आहे. दुर्दैवाने या अपघाता कसलीही जीवंत हानी झालेली नाही.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी ट्रेन क्रमांक ५२१५५ मिनी ट्रेन अमन लाजवरून माथेरानचा दिशेने निघाली होती. यादरम्यान सकाळी ९ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास अमन लाज ते माथेरान दरम्यान मिनी ट्रेनचा एक डब्बा रुळांवरुन खाली घसरला

या घटनेमुळे काहीकाळ खळबळ उडाली होती. सुदैवाने ह्या घटनेत कोण्ही जखमी झालेले नाही. या घटनेची माहिती मिळतात मध्य रेल्वेचे अभियांत्रिकी पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत रुळांवरुन खाली घसरलेला डबा पुन्हा रुळावर ठेवला.

सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास घसरलेला डबा पुन्हा शटल सेवेला जोडण्यात आला. त्यानंतर ट्रेनची आणि रुळांची तपासणी करुन सकाळी १० वाजून ५० मिनिटांनी मिनी ट्रेनची वाहतुक पुन्हा सुरु करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com