Thane News: हाउसिंग सोसायट्यांमध्ये बकरे ठेवता येणार नाहीत; कुर्बानीवर बंदी, पण का? पालिकेनं सांगितलं मोठं कारण

No Goat Sacrifice in Housing Societies: मीरा भाईंदर महानगरपालिकेने गृहनिर्माण सोसायट्या, घरे, दुकाने आणि सार्वजनिक रस्त्यांवर बकऱ्या ठेवण्यास आणि त्यांचा बळी देण्यास बंदी घातली आहे.
No Goat Sacrifice in Housing Societies

No Goat Sacrifice in Housing Societies

ESakal

Updated on

मुंबईला लागून असलेल्या ठाणे जिल्ह्यातील मीरा-भायंदर महानगरपालिकेने बकऱ्यांच्या बळीसंदर्भात एक मोठे पाऊल उचलले आहे. एमबीएमसीने गृहनिर्माण सोसायट्या, घरे, दुकाने आणि रस्त्यांवर बकऱ्या पाळण्यास आणि त्यांचा बळी देण्यास बंदी घातली आहे. सत्ताधारी भाजपने मंगळवारी हा निर्णय घेणारा ठराव मंजूर केला. या ठरावात रस्त्यावरील भटक्या जनावरांना चारा देण्यासही बंदी घालण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com