

BJP MLA Narendra Mehta Controversial Statement
ESakal
मिरा-भाईंदर : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून ‘पांढऱ्या पट्टी’चा वाद अधिकच वाढत असल्याचे दिसून येत आहे. सोसायटी तसेच रस्त्यांवर जैन धर्मियांसाठी पांढरी पट्टी मारण्यात येत असल्यामुळे वाद पेटला होता. तसेच मिरा-भाईंदरमधील तपोवन विद्यालयात बहुतांश विद्यार्थी जैन समाजाचे असल्याने प्रवेशावेळीच मांसाहार आणि कंदमुळे न आणण्याच्या सूचना दिल्या जात, असल्याचे प्रकरण समोर आले होते. अशातच मिरा-भाईंदर ही जैनांची नगरी असल्याचा दावा भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी केला आहे.