mira bhayandar
mira bhayandar

मिरा-भाईंदर हदरलं ! चार दिवसांत तब्बल 100 हून अधिक कोरोनाबाधित

मिरा रोड : मिरा-भाईंदर शहरात गेल्या चार दिवसात तब्बल 109 जणांना कोरोनाची लागण झाल्याने खळबळ माजली आहे. शहरात 21 मे रोजी 13 रुग्ण सापडले असून एकाचा मृत्यू झाला. 22 मे रोजी 51 रुग्ण सापडले, 23 मे रोजी 34 रुग्ण सापडले तर दोघांचा मृत्यू झाला. तर 24 मे रोजी 11 रुग्ण सापडले असून एकाचा मृत्यू झाला आहे. 

दरम्यान पालिका आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी 22 मे रोजी मुलाखतीत 51 पॉझिटिव्ह आल्याने नागरिकांनी घाबरू नये, हा ३ दिवसांचा अहवाल असल्याचे माहिती दिली होती. दरम्यान आयुक्तांच्या या वक्तव्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.  मुंबई महापालिकेसहित इतर महापालिकांचा सायंकाळी सहा वाजता जाहीर होणारा अहवाल मिरा भाईंदर महानगरपालिका मात्र रात्री उशिराने जाहीर करते. याठिकाणी प्रशासनामध्ये कोणताही समन्वय नसल्याने अहवाल जाहीर करण्यास उशीर होत असल्याचे नागरिक म्हणत आहेत. 

दरम्यान लॉकडाऊन असूनही शहरातील वाढत्या कोरोना बाधितांच्या संख्येमुळे जागरूक नागरिक चिंता व्यक्त करत आहेत. शहरात आतापर्यंत एकूण 499 कोरोना बाधित रुग्ण सापडले असून 303 बरे झाले आहेत. तर आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला आहे. आता शहरातील ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 181 असून असल्याची माहिती पालिका प्रशासनाने आपल्या अहवालात नमूद केली आहे.

प्रविण दरेकर यांची भेट
दोन दिवसांपूर्वी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शहरात येऊन कोरोना बाबत प्रशासन कोणत्या उपाययोजना करते याची माहिती घेतली. तसेच शहरातील आरोग्य सुविधेबाबत त्यांनी समाधान व्यक्त केल्याचे महापौर ज्योत्स्ना हसनाळे सांगितले.

Mira Bhayandar was Over 100 coronavirus patient in four days

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com