esakal | मिरा भाईंदर : महानगरपलिकेचा अनोखा उपक्रम सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील पाण्यावर उद्याने
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

मिरा भाईंदर : महानगरपलिकेचा अनोखा उपक्रम सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील पाण्यावर उद्याने

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भाईंदर : मिरा भाईंदर (Mira Bhayander) शहरात दररोज निर्माण होणार्‍या सांडपाण्यावर प्रक्रिया करुन त्या पाण्याचा (Water) पुनर्वापर आता उद्याने, अग्निशमन विभाग तसेच बांधकाम क्षेत्रासाठी केला जाणार आहे. सध्या मिरा रोड (Mira Road) येथील हटकेश भागातील सांडपाणी प्रक्रिया केंद्रात महापालिकेने (Municipal) आणखी एक शुद्धीकरण प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पाद्वारे पुनर्वापरासाठी दररोज ५ दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होणार आहे.

भूमिगत गटार योजनेद्वारे शहरातील सांडपाणी, महापालिकेच्या प्रक्रिया केंद्रात (एसटीपी) नेले जाते. या प्रक्रिया केंद्रात त्यावर प्रक्रिया करुन सध्या हे पाणी नाल्यात सोडण्यात येते. हे पाणी चांगले असले तरी त्याचा इतर वापरासाठी उपयोग होऊ शकत नव्हता. त्यामुळे या वाया जाणार्‍या पाण्यावर पुन्हा प्रक्रिया करुन त्याचा पिण्या व्यतिरिक्त इतर कामासाठी वापर करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. त्यानुसार मिरा रोड येथील हटकेश भागात असलेल्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रात महापालिकेने सुमारे चार कोटी रुपये खर्च करुन ‘टर्शरी प्रक्रीया प्रकल्प’ उभारला आहे. सांडपाणी प्रक्रीया केंद्रातून बाहेर पडलेले पाणी या टर्शरी प्रक्रिया प्रकल्पात सोडले जाते. त्याठिकाणी पुन्हा त्यावर प्रक्रिया केली जाते. त्यानंतर हे पाणी पिण्या व्यतिरिक्त इतर कामासाठी उपयुक्त होते.

हेही वाचा: गणेशमूर्ती आमची, किंमत तुमची! आधार प्रतिष्ठानचा अनोखा उपक्रम

दररोज पाच दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया करण्याची टर्शरी प्रक्रिया प्रकल्पाची क्षमता आहे. प्रक्रिया केलेले पाणी त्याच ठिकाणी बांधण्यात आलेल्या टाकीमध्ये साठवण्यात येत आहे. नंतर टँकरद्वारे त्याचा पुरवठा केला जाणार आहे. हे पाणी वाहून नेणार्‍या टँकरना देखील इतर टँकरपेक्षा वेगळा विशिष्ट रंग दिला जाणार आहे आणि त्यावर पिण्या व्यतिरिक्त वापराचे पाणी असे स्पष्टपणे उल्लेख करण्यात येणार आहे. हे पाणी महापालिकेच्या उद्यानांसाठी तसेच अग्निशमन विभागासाठी वापरले जाणार आहे. तसेच बांधकाम क्षेत्रालाही त्याचा महापालिकेकडून व्यावसायिक पुरवठा केला जाणार आहे. या पाण्यात क्षार नसल्यामुळे बांधकाम क्षेत्रासाठी हे अतिशय उपयुक्त असणार आहे तसेच विकासकांना सध्या द्यावा लागत असलेल्या दरापेक्षा कमी दरात ते दिले जाणार आहे.

हेही वाचा: शेतकरी दांपत्याचा अनोखा उपक्रम: गावातील शंभराहून अधिक महिलांच्या उपस्थितीत केली राणी गायीची ओटी भरणी

सध्या प्रायोगिक तत्वावर हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. नागरिकांकडून मिळणारा प्रतिसाद पाहून महापालिकेच्या उर्वरित सांडपाणी प्रक्रिया केंद्रातही असे प्रकल्प उभारले जातील

- सुरेश वाकोडे, कार्यकारी अभियंता, मिरा भाईंदर महानगरपालिका

loading image
go to top