मिरा-भाईंदरचा पाणीप्रश्‍न निकाली, 135 एमएलडी पाणी मिळणार

water
water

भाईंदर : गेले काही दिवस मिरा-भाईंदर शहराचा पाणीपुरवठा विस्कळित झाला असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मिरा भाईंदरच्या पाणीप्रश्‍नावर सोमवारी मंत्रालयात उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी बैठक बोलावली होती. मिरा भाईंदर शहरासाठी 135 एमएलडी पाणी आरक्षित आहे. या मंजूर कोट्याप्रमाणे संपूर्ण पाणी मिरा भाईंदरला देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तांत्रिक बाबींची पूर्तता करून येत्या काही दिवसांत हे वाढीव पाणी मिरा भाईंदरला शहराला मिळेल, असे सांगण्यात आले. पुढच्या काही महिन्यांत आणखी 20 एमएलडी पाणी मिरा भाईंदरला देण्याबाबतही बैठकीत चर्चा झाल्याचे महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी सांगितले. 

बैठकीत मंत्री सुभाष देसाई यांच्याकडून मिरा भाईंदरच्या पाणीपुरवठ्याचा आढावा घेण्यात आला. मिरा भाईंदर शहराला "एमआयडीसी'कडून सध्या 100 एमएलडीच्या आसपास पाणी मिळत आहे. प्रत्यक्षात 135 एमएलडी इतके पाण्याचे आरक्षण जलसंपदा विभागाकडून मिरा भाईंदरसाठी आहे. त्यामुळे संपूर्ण मंजूर असलेले 135 एमएलडी पाणी मिरा भाईंदरला द्यावे, त्याशिवाय अतिरिक्त किमान 25 एमएलडी पाणी मिरा भाईंदर शहरासाठी मंजूर करावे, अशी विनंती आमदार प्रताप सरनाईक व महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी बैठकीत केली. शहराची लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे एमआयडीसीकडून मंजूर कोट्याप्रमाणे पाणी देण्याबाबत कार्यवाही करावी, अशा सूचना मंत्री सुभाष देसाई यांनी केल्या. 

"एमआयडीसी'कडून नवी मुंबई महापालिका आजही 35 एमएलडी पाणी घेत आहे. त्या पाण्याची नवी मुंबई पालिकेला गरज नाही, असे पत्र पालिकेने एमआयडीसीला दिले आहे. नवी मुंबईचे स्वतःचे मोरबे धरण असल्याने त्यांच्या "एमआयडीसी' कोट्यामधील 20 एमएलडी पाणी मिरा भाईंदर शहरास दिले जावे, असा पर्याय बैठकीत पुढे आला. म्हणजे आधीचे मंजूर 135 एमएलडी पाणी तात्काळ मिरा भाईंदरला मिळणार आहे; तर पुढच्या काही महिन्यांत नवी मुंबईला नको असलेले 20 एमएलडी असे एकूण 155 एमएलडी पाणी मिरा भाईंदर शहराला मिळणार आहे, असे या बैठकीत ठरले आहे. 

मिरा भाईंदरला पाणीपुरवठा करण्यासाठी सूर्या पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू आहे. सूर्या पाणीुरवठा प्रकल्प पूर्ण होईपर्यंत 155 एमएलडी पाणी मिरा भाईंदरला द्यायचे आहे, असे बैठकीत ठरले आहे. याबाबत उद्योगमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. या बैठकीला खासदार राजन विचारे, आमदार गीता जैन, महापौर ज्योत्स्ना हसनाळे, आयुक्त विजय राठोड, कॉंग्रेसचे गटनेते जुबेर इनामदार, शिवसेनेच्या गटनेत्या नीलम ढवण, विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील, "एमआयडीसी'चे अधिकारी वाघ व अन्य मान्यवर उपस्थित होते. 

20 द.ल.लि. पाणी पुरवठा लवकरच

या शहराची वाढती लोकसंख्या आणि पाणी पुरवठ्यातील तफावत लक्षात घेता नवी मुंबई महापालिकेकडून मंजूर असलेल्या 60 द.ल.लि. पाणी पुरवठ्यापैकी काही प्रमाणात पाणीपुरवठा मिरा भाईंदर शहराला केला जावा, अशी मागणी महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी केली असता या 60 द.ल.लि. पैकी 20 द.ल.लि. पाणी पुरवठा मिरा भाईंदर शहराला लवकरच दिला जाईल, अशी घोषणाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली आहे. 

(संपादन : वैभव गाटे)

Mira Bhayanders water problem solved 135 MLD water will be available

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com