

Mira Road Controversy Bakri Eid
ESakal
भाईंदर : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मिरा रोड येथील एका गृहसंकुलात बकऱ्या बांधून ठेवण्यावरून तणावाची परिस्थिती निर्माण झाली. हा वाद इतका वाढला की प्रकरण थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचले. सोमवारी (ता. २५) रात्री या मुद्द्यावरून झालेल्या जोरदार वादात एक जण जखमी झाला असून, त्यानंतर पोलिसांनी संकुलात कडेकोट बंदोबस्त तैनात केला. गेल्या वर्षीदेखील मिरा रोडमधील एका गृहसंकुलात अशाच प्रकारचा वाद निर्माण झाला होता.