Mira Road killing : पीडितेची ओळख पटली, आरोपीचा धक्कादायक खुलासा! म्हणाला, "वयाच्या फरकामुळे..."

Mira Road killing
Mira Road killing

Mira Road killing : मुंबईतील मीरा रोड येथील गीता नगर भागात राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या लिव्ह इन पार्टनरची हत्या करून तिच्या मृतदेहाचे अनेक तुकडे केले. यानंतर आरोपीने कुकरमध्ये शिजवून आणि मिक्सरमध्ये बारीक करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आरोपीची आज चौकशी केली आहे.

गुरुवारी अटक करण्यात आलेला आरोपी मनोज रमेश साने (56) हा पोलीस कोठडीत आहे. पोलिसांनी त्याची आज चौकशी केली. यावेळी त्याने पोलिसांना धक्कादायक माहिती दिली आहे.
 
पोलिसांनी पीडितेची ओळख पटवली आहे. तिच्या 3 बहिणींना बोलावून ओळख पटवण्यात आली. मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्याचे काम सुरू आहे. त्यांच्या डीएनएची तपासणी केल्या जात आहे. तसेच तपासात हे लोक विवाहित असल्याचे समोर आले आहे. वयाच्या फरकामुळे त्यांनी इतर कोणालाही लग्नाबाबत सांगितले नाही, अशी माहिती पोलिस उपायुक्त जयंत बजबळे यांनी दिली आहे. (Crime News)

Mira Road killing
Pune News : पुण्यात CBI ची मोठी कारवाई, IAS अधिकाऱ्याला ८ लाखाची लाच घेताना रंगेहाथ पकडले

पीडितेच्या तीन बहिणींचे जबाब नोंदवले जात असून, डीएनए चाचणी देखील केली आहे. बहिणी सतत सरस्वतीच्या संपर्कात होत्या, त्यामुळे त्यांची विधाने खूप महत्त्वाची आहेत. फॉरेन्सिक तपासणीनंतर अंत्यसंस्कारासाठी शरीराचे अवयव बहिणींच्या ताब्यात दिले जातील, अशी माहिती देखील जयंत बजबळे यांनी दिली आहे.

न्यायालयाने सानेला 16 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली :

पोलिसांनी एफआयआरमध्ये आयपीसीच्या कलम 302 (हत्या) आणि 201 (पुरावा नष्ट करणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस डीसीपी जयंत बजबळे म्हणाले, “त्याला ठाण्यातील न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने त्याला 16 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.''

Mira Road killing
MVA Love JIhad: "महाविकास आघाडीच एक प्रकारचा 'लव जिहाद'"; भाजपची शेलक्या शब्दांत टीका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com