Mumbai News: गणेश विसर्जनानंतर मुस्लिम समाजाचा जुलूस, मोहम्मद पैगंबर जन्मदिननिमित्त शासकीय सुट्टीची विनंती
Rais Shaikh : ईद-ए-मिलादुन नबीचा जुलूस यंदा सोमवार, ८ सप्टेंबर रोजी काढण्यात येणार आहे. त्यामुळे या दिवशी शासकीय सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी रईस शेख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
मुंबई : मुस्लिम समाजासाठी पवित्र असलेला मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिन यावर्षी शुक्रवारी दिनांक ५ सप्टेंबर रोजी आहे. त्यानंतर शनिवारी, दिनांक ६ रोजी राज्यभरात अनंत चतुर्दशी निमित्त गणेश विसर्जन पार पडणार आहे.