मुंबई
Maharashtra Politics: भाजपाची फोडाफोडी! महेश पाटलांच्या प्रवेशावर शिंदे गटाचा टोला
Shinde Shivsena Criticized On BJP: शिवसेना शिंदे गटातील महेश पाटील यांचा भाजपातील प्रवेशानंतर शिंदे गटाने भाजपला टोला लागवला आहे.
डोंबिवली : शिवसेना शिंदे गटातील तालुका प्रमुख महेश पाटील यांचा भाजपातील पक्ष प्रवेश शिंदे गटाच्या जिव्हारी लागला आहे. भाजपकडून पक्ष फोडाफोडी होत असताना मित्रपक्ष कायम निवडणुका आल्या की हे काम करतो, असे म्हणत आमदार राजेश मोरे यांनी मित्रपक्ष भाजपाला टोला लागवला आहे. कोणाच्या येण्या जाण्याने आम्हाला फरक पडत नाही असे म्हणत येथे महायुतीचा झेंडा फडकेल असे विधान केले आहे.

