'आजचा अभिमानाचा क्षण' म्हणत राम कदमांनी ट्विटरवर टाकला एक फोटो, फोटो टाकताच कदम झालेत ट्रोल...

सुमित बागुल
Wednesday, 5 August 2020

राम कदम यांनी देखील आजच्या राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रमावर एक ट्विट केलं. यामध्ये त्यांनी Today’s Proud Moment या कॅप्शनने एक फोटो ट्वीट केला.

मुंबई : अयोध्येत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचं भूमिपूजन पार पडलं. अनेक दशकांपासून सुरु असलेला राम मंदिरासाठीचा लढा आज समाप्त झाला असं पंतप्रधान नरेंद्र मोदीही म्हणालेत. देशभरात आज राम मंदिर भूमिपूजनाच्या निमित्ताने उत्साहाचं वातावरण होतं. देशात कोरोनाचं संकट आहे. अशात कोरोनामुळे केवळ काही मान्यवरांच्या उपस्थितीत आजचा भूमिपूजन सोहळा पार पडला. राम मंदिरासाठी देशभरात रथयात्रा काढणारे लालकृष्ण आडवाणी हे देखील घरातून कार्यक्रम पाहत आहेत असं सरसंघचालक मोहन भागवत म्हणालेत. दरम्यान अनेकांना या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं होतं मात्र, कोरोनामुळे अनेकजण कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावनांना वाट करून दिली. 

BIG NEWS : कोरोनावरील दोन मोठ्या कंपन्यांच्या गोळ्या बाजारात, किंमत केवळ ३५ रुपये

मुंबईतील भाजपचे आमदार राम कदम यांनी देखील आजच्या राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रमावर एक ट्विट केलं. यामध्ये त्यांनी Today’s Proud Moment या कॅप्शनने एक फोटो ट्वीट केला. या फोटोमध्ये अमेरिकेतील टाइम्स स्क्वेअरवर श्रीरामांचे फोटो लावलेले पाहायला मिळतायत. यामध्ये #Times_Square #USA #AyodhyaBhoomipoojan #ModiHaiTohMumkinHai असे हॅशटॅग देखील वापरले गेलेत. दरम्यान या ट्विटवरून राम कदम यांना आता चांगलंच ट्रोल करण्यात येतंय. 

राम कदम यांनी टाकलेल्या या फोटोवर नेटकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्यात.  नेटकऱ्यांनी या फोटोवरून राम कदम यांना ट्रोल देखील केलंय. श्रीरामांचे फोटो टाकताना तरी विचार करावा. श्रीरामांच्या बाबतीत खोटारडेपणा करू नका अशी प्रतिक्रिया देण्यात आलीये. असे फोटो टाकताना आपल्या IT सेलचा देखील सल्ला घ्या असंही काहींनी सुचवलं. या फोटोवर अनेक कमेंट्स आल्या होत्या. दरम्यान राम कदम यांच्या ट्विटर प्रोफाईलवरून आता हा फोटो काढून टाकण्यात आलाय.

MLA ram kadam trolled after posting photoshoped image of shri ram


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA ram kadam trolled after posting photoshoped image of shri ram