

MMRDA Six Lane Project on Thane to Bhiwandi
ESakal
ठाणे : शहरात वाढती वाहतूक कोंडी पाहता प्रवाशांसह वाहनचालकांचे अतोनात हाल होत असल्याचे चित्र दिसून येते. यामुळे वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आणि नागरिकांचा प्रवास आरामदायी करण्यासाठी प्रशासनाकडून नवनवीन प्रकल्प सुरु केले जातात. ठाणे ते भिवंडी दरम्यान देखील नेहमी वाहतूक कोंडी असल्यामुळे ४५ मिनिटांचा प्रवास पूर्ण करण्यासाठी २ तास लागतात. यामुळे नागरिकांचे हाल होत असून यावर उपाय म्हणून एमएमआरडीएने (MMRDA) नव्या प्रकल्पाची घोषणा केली आहे.