एमएमआरडीएच्या एकात्मिक तिकीट प्रणालीला मंजुरी; लवकरच निविदा प्रक्रियेला होणार सुरुवात.. 

Integrated ticketing system
Integrated ticketing system

मुंबई: मुंबई महानगर क्षेत्रातील परिवहन सेवांसाठी एकात्मिक तिकीट प्रणालीच्या सुधारित प्रस्तावास मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून मंजुरी देण्यात आली आहे. या प्रणालीसाठी सदर कंपनीसाठी न थांबता कार्यालयीन स्तरावर अंमलबजावणी कशी करता येईल याबाबत चर्चा सुरु असून लवकरच निविदा प्रक्रिया राबवण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे असे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.    

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एमएमआरडीएतर्फे ऑनलाईन बैठक मंगळवारी पार पडली. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीत 16 जुन्या व नव्या प्रकल्पाच्या अंलबजावणीबाबत महत्वाचे निर्णय घेण्यात आले. तसेच काही रखडलेल्या प्रकल्पाना मंजुरी देण्यात आली. .

यावेळी बहुप्रतीक्षित एकात्मिक तिकीट प्रणालीच्या अमंलबजावणीच्या सुधारित प्रस्तावास मंजुरी देण्यात आली. येत्या काही वर्षांत मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्थेचा चेहरामोहरा बदलण्याचा मास्टरप्लॅन एमएमआरडीएकडे तयार आहे. 

यानुसार ३४० किमी मेट्रोचे जाळे उभारले जाणार असून, अनेक ठिकाणी उड्डाणपुलाची नव्याने निर्मिती करणे सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर, मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील मेट्रोसह मोनो, बेस्ट, उपनगरीय रेल्वे आणि मुंबई महानगर क्षेत्रातील परिवहन सेवांमधील वाहतूक एकाच तिकिटावर करणे सुलभ व्हावे यासाठी एकात्मिक तिकीट प्रणाली राबवण्यासाठी अनेक वर्षांपासून एमएमआरडीए प्रयत्नशील आहे. 

गतवर्षी मे महिन्यात या प्रणालीला राज्य सरकारने मंजुरी दिली असून सीडॅक कंपनीकडे त्याच्या नियोजनाची जबाबदारी होती. मात्र या प्रणालीसाठी सदर कंपनीसाठी न थांबता कार्यालयीन स्तरावर अंमलबजावणी कशी करता येईल याबाबत चर्चा करून निविदा काढण्यात येणार आहे. 

तिकिटांसाठी स्मार्ट कार्ड:
 
तिकीट प्रणाली स्मार्ट कार्डच्या स्वरूपातली असेल , ते कुठूनही किंवा ऑनलाइन पद्धतीने  रिजार्च करता येईल. पेमेंट अँपच्या धर्तीवर थेट बँक खात्यांमधूनही तिकिटांची रक्क्कम अदा करता येईल. ही सुविधा आणि भविष्यातील प्रवासी भाड्यासाठी अनुकूल धोरण तयार  करण्यासाठी सल्लागार नियुक्त केले जातील. तसेच ही योजना टप्याटप्याने राबविण्याचा एमएमआररडीए मानस असून कालांतराने केंद्र सरकारच्या योजनेमध्ये समायोजनाची क्षमताही त्यात असेल असे सांगण्यात आले. 

MMRDA started Integrated ticketing system read full story 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com