

Mumbai Traffic Solved by LBS road to BKC flyover
ESakal
मुंबई : मुंबईतील सर्वात वर्दळीच्या रस्त्यांपैकी एक असलेल्या एलबीएस मार्ग आणि आर्थिक क्रियाकलापांचे केंद्र असलेल्या वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स दरम्यान वाहतुकीची मोठी समस्या आहे. या मार्गावर वाहतुकीचा ताण इतर मार्गांपेक्षा लक्षणीयरीत्या जास्त आहे. हा ताण कमी करण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी एलबीएस मार्ग-बीकेसी उड्डाणपूल कनेक्टर बांधला जात आहे. या कनेक्टरचे काम ८५% पूर्ण झाले आहे.