
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (एमएमआरडीए) अनेक पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची कामे सुरू आहेत. कोरोनासंकटामुळे लॉकडाऊन सुरू असल्याने ही कामे रखडणार असून, खर्चातही वाढ होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
कोव्हिड-19 च्या प्रकोपामुळे देशभरात लॉकडाऊन जारी असल्याने महामुंबई परिसरातील एमएमआरडीएच्या प्रकल्पांना अंशत: स्थगिती देण्यात आली होती़. सोशल डिस्टन्सिंग पाळून टप्प्याटप्प्याने काही प्रकल्पांचे काम सुरू करण्यात आले आहे. आगामी काळात उर्वरित प्रकल्पांचीही कामे पुन्हा हाती घेतली जाती, असे सांगण्यात आले. बहुतेक प्रकल्प मुख्य रस्ते व महामार्गांवर असल्याने तेथील कामांना हळुहळू सुरुवात करण्यात आली आहे. स्थानिक पोलिस आणि प्रशासनाला कळवणे, कामगारांची कार्ड बनवणे, वेतन अदा करणे अशा प्रक्रिया सुरू आहेत. या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रकल्पांची कामे सुरू करण्यात येतील. या पार्श्वभूमीवर प्रकल्पांचा कालावधी आणि खर्चातही वाढ होईल, असे एमएमआरडीए अधिकाऱ्यांनी सांगितले.
नवीन कामांनाही विलंब
निविदा प्रक्रिया रखडल्यामुळे नव्या प्रकल्पांनाही लेटमार्क लागणार आहे. डी. एन. नगर ते दहिसर मेट्रो-2 ए आणि अंधेरी (पूर्व) ते दहिसर (पूर्व) या मेट्रो मार्गिकांचा त्यात समावेश आहे. स्थानकांवरील सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प, ‘मुंबई आय’, महामुंबई पब्लिक आर्ट प्रोजेक्ट, मेट्रो-4 मार्गिकेसाठी डब्यांची निर्मिती, वडाळा येथील बहुविध वाहतूक प्रणाली आणि महावीर नगर कांदिवली ते गोराई गाव रोप-वे या प्रकल्पांची सुरुवातच विलंबाने होणार आहे. यापैकी तीन प्रकल्पांची निविदा प्रक्रिया मार्चअखेर पूर्ण होणार होती. त्यांना आता दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे.
MMRDA will also be hit by the lockdown
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.