परिसरातील स्वच्छता तर होईल, मानसिक स्वच्छतेचे काय? महिलांच्या सुरक्षिततेबाबत मनसेचा सवाल

परिसरातील स्वच्छता तर होईल, मानसिक स्वच्छतेचे काय? महिलांच्या सुरक्षिततेबाबत मनसेचा सवाल
Updated on

प्रभादेवी : गांधी जयंती निमित्त स्वच्छता अभियानाची सांगड घालत आम्ही परिसर स्वच्छ करू, मात्र समाजात पसरलेली विकृत मानसिकता स्वच्छतेचे काय? राज्य सरकार महिलांना सुरक्षा देणार का ? असा सवाल विचारत मनसेने महिलांच्या सुरक्षिततेविषयी आवाज उठविला.  

गांधी जयंती निमित्त शुक्रवारी वरळी येथील गोपाळ नगर व बावन चाळ परिसरात मनसेच्या वतीने स्वच्छता अभियान व उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळेस समाजात पसरलेल्या मानसिक विकृतीवर लक्ष वेधत महिलांवर होणारे अत्याचार व सुव्यवस्था यावर सवाल उपस्थित करण्यात आले.
परिसर स्वच्छ आम्ही करू मानसिक स्वच्छता करणार का, महिलाना सुरक्षा आपण देणार का, नराधमाना शिक्षा देणार का, निर्भयाना जलदगती न्याय मिळणार का अशा सवालांचे फलक हातात घेऊन मनसेच्या कार्यकर्त्यांनी परिसरात स्वच्छता मोहीम राबविली.

एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा; लवकरच मिळणार एक महिन्याचे थकीत वेतन

महिलांच्या सुरक्षिततेविषयी कठोर कायदा केला पाहिजे महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांचे खटले जलद न्यायालयात करून त्यांना फासावर लटकविले पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

परवानगी मिळाली; आता कोरोना रुग्णांवर होणार आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी उपचार

हाथरस येथे महिलेवर झालेल्या आत्याचाराची घटना माणुसकीला काळिमा फसणारी आहे महिलांवर वारंवार अत्याचाराच्या घटना घडत आहे शासना पर्यंत आवाज पोहचविण्यासाठी स्वच्छता मोहिमेची सांगड घालत अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आल्याचे मनसेचे माहीम विधानसभा अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी सांगितले.

-----
संपादन : ऋषिराज तायडे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Maharashtra Approves 50% Pension Formula After Long Employees’ Protest
Maratha History Row Deepens; Bhosale Royal Descendants Approach High Court
Being Human First: Yajuvendra Mahajan on the True Essence of Goodness
Fight Against Female Foeticide: MLA Sneha Dubey-Pandit Appointed to State Monitoring Committee
Marathi News Esakal
www.esakal.com