जेंव्हा राज ठाकरे सफाई कर्मचाऱ्यांच्या खांद्यात खांदे मिसळून फोटो काढतात

सुमित बागुल
Saturday, 14 November 2020

राज ठाकरे यांच्या साधेपणाची प्रचिती आपण अनेकदा घेतलीये माध्यमांमधून पाहिली देखील आहे. याचीच पुनरावृत्ती पुन्हा एकदा झाल्याचं पाहायला मिळालं

मुंबई : महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय नेत्यांपैकी एक म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे. राज ठाकरे ज्या पद्धतीने भाषण करतात त्याच पद्धतीचा त्यांचा स्वभाव, अगदी स्पष्ट, रोखठोक आणि तेवढाच पारदर्शी देखील असं राजकीय विश्लेषक म्हणतात.

महत्त्वाची बातमी : सावधान ! कोविडची दुसरी लाट फेब्रुवारीत ? डॉक्टर सांगतायत कशी घ्यावी काळजी

राज ठाकरे यांच्या साधेपणाची प्रचिती आपण अनेकदा घेतलीये माध्यमांमधून पाहिली देखील आहे. याचीच पुनरावृत्ती पुन्हा झाल्याचं पाहायला मिळालं. याला कारण ठरलंय राज ठाकरे यांनी सफाई कर्मचाऱ्यांना काढू दिलेले फोटो.    

राज ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव अमित राज ठाकरे हे त्याच्या कृष्णकुंज निवास्थानासमोरील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात टेनिस खेळायला येतात. असेच गुरुवारी राज ठाकरे आणि अमित ठाकरे टेनिस खेळायला गेले होते. राज ठाकरे आणि अमित ठाकरे आल्याचं तिथल्या काही सफाई कामगारांनी पाहिलं आणि त्यांनी राज ठाकरे यांच्यासोबत फोटो काढण्याची इच्छा दर्शवली . 

महत्त्वाची बातमी :  "माझं खासगी आयुष्य तिथेच संपलं", मुलाखत देताना संजय राऊत झालेत भावनिक

दरम्यान, राज ठाकरे यांनी क्षणाचाही विलंब न करता सफाई कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर हात टाकून फोटो काढला. राज ठाकरेंकडून मिळालेल्या अशा प्रतिसादाने सफाई कर्मचारी देखील प्रचंड चांगलेच भारावून गेलेत. 

MNS chief raj thackeray clicked pictures with safai workers at shivaji park


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS chief raj thackeray clicked pictures with safai workers at shivaji park