अमित ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र, पत्रास कारण की...

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 July 2020

आतापर्यंत कोरोना व्हायरसच्या संकट काळात अमित ठाकरेंनी बऱ्याचदा राज्य सरकारशी पत्रव्यवहार केला आहे. अमित ठाकरेंनी आता मुख्यमंत्र्यांना खासगी शाळांचा मनमानी कारभार सुरु आहे. त्याबाबत पत्र लिहिले आहे

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपूत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा पत्र लिहिलं आहे. आतापर्यंत कोरोना व्हायरसच्या संकट काळात अमित ठाकरेंनी बऱ्याचदा राज्य सरकारशी पत्रव्यवहार केला आहे. अमित ठाकरेंनी आता मुख्यमंत्र्यांना खासगी शाळांचा मनमानी कारभार सुरु आहे. त्याबाबत पत्र लिहिले आहे. खाजगी शाळा पालकांकडून फीची मागणी करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पालकांना दिलासा देण्याची मागणी अमित ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. 

अंगावर काटा आणणारी बातमी ! मुलांवर बारीक लक्ष ठेवा, नाहीतर १२ वर्षीय सुमितसारखं व्हायला वेळ लागत नाही...

काही दिवसांपूर्वी फी दिल्यास काही खासगी शाळा पालकांना आपल्या मुलांना शाळेतून नावनोंदणी रद्द करण्याची धमकी देत आहेत. या पार्श्वभूमीवर काही पालकांनी अमित ठाकरे यांची भेट घेऊन त्यांचे प्रश्न आणि त्यांच्या तक्रारी समजावून सांगितल्या होत्या. यानंतर अमित ठाकरे मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार केला. 
 

खाजगी शाळांचं सरकारच्या आदेशाकडे दुर्लक्ष
काही दिवसांपूर्वी सानपाडा येथील विब्ग्योर ग्रुप ऑफ स्कूल आणि रायन इंटरनॅशनल स्कूल या दोन खासगी शैक्षणिक संस्थांनी सरकारच्या आदेशाकडे दुर्लक्ष केलं. या दोन्ही शैक्षणिक संस्थांच्या अनेक शाळा मुंबईत आहेत. या दोन्ही संस्थांनी सरकारच्या नियमाचं पालन न करत पालकांकडे या चालू शैक्षणिक वर्षाच्या फीची मागणी केली होती.

मुंबईकरांनो! गणपतीला गावी जायचंय... मग त्याआधी गावकऱ्यांचे नियम जाणून घ्या...

शालेय शिक्षण विभागाने 30 मार्चला एक परिपत्रक काढलं होतं. लॉकडाऊन दरम्यान शाळा व्यवस्थापन संवेदनशील रहावे आणि पालकांना फी भरण्यास भाग पाडू नये, असे आवाहन सरकारनं केलं होतं. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी एक व्हिडिओही शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये शिक्षणमंत्र्यांनी शाळा फी भरण्याची मागणी करत असल्यास पालकांना स्थानिक अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी, असं सांगितलं होतं. 

मोठी बातमी - मुंबई, पुण्यातील फेरीवाल्यांबद्दल स्पष्ट केली भूमिका, सरकार म्हणतंय....

उपमुख्यमंत्र्यांनाही लिहिले होते पत्र
काही दिवसांपूर्वी आशा स्वयंसेविकांचा मासिक मोबदला वाढवून द्यावा, अशी मागणी अमित ठाकरे यांनी पत्राद्वारे केली होती. अमित ठाकरे यांनी फेसबुकवर हे पत्र शेअर केले होते. त्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी अमित ठाकरेंनी केलेली मागणी पूर्ण केली. राज्यातील सर्व आशा भगिनीच्या मानधनात 2 हजार रुपये तर आशा गटप्रवर्तकांच्या मानधनात 3 हजार रुपये कायमस्वरुपी वाढ करण्याचा शासनानं निर्णय घेतला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mns chief raj thackerays son amit thackeray writes letter to cm uddhav thackeray over school fees